Description
आज मानवजातीला किंबहुना त्याच्या अस्तित्वाला जे अनेक प्रश्न आव्हाने देत आहेत, त्यापैकी एक म्हणजे ‘कॅन्सर’ ही व्याधी. या रोगाचे नाव जरी घेतले तर एकप्रकारची धास्तीच बसते. हा रोग झाला म्हणजे निश्चित मृत्यू, आणि तोही हाल-हाल होत. प्रचलित उपचारपद्धती अशी आहे की, आर्थिकदृष्ट्या न परवडणारी. अशा रोगावर गेली २५-३० वर्षे होमिओपॅथिक पद्धतीने यशस्वीरीत्या उपचार करणारे कोल्हापुरातील ज्येष्ठ होमिओपॅथिक फिजिशियन डॉ. प्रकाश शिंदे यांनी आपणास आलेले अनुभव ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या आपणच लिहिलेल्या पुस्तकामध्ये दिले आहेत. निश्चितच जे कोणी हे पुस्तक वाचतील, त्यांना कॅन्सर होऊ नये, एवढेच नव्हे तर, जरी झाला असला तर त्याला यशस्वीरीत्या कसे सामोरे जावयाचे, याचे निश्चितच चांगले मार्गदर्शन मिळणार आहे. या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहावी यासाठी त्यांनी माझ्या कडे प्रसिद्धीपूर्व पुस्तकाची प्रत वाचावयास दिली, आणि ती लक्षपूर्वक वाचल्यानंतर त्यांचे जे कॅन्सरसारख्या रोगासंबंधीचे अनुभव आहेत, ते हल्ली कॅन्सरप्रमाणेच मानवजातीस विशेषतः भारतीय वंशाच्या लोकांना, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेहसारख्या रोगांनी जो विळखा घालण्यास सुरुवात केली आहे, तीही टाळण्यास उपयोगी पडणार आहे. कारण या जंतूविरहित रोगाचे मग तो कॅन्सर असो वा रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार याचा संबंध एक अनुवंशिकता सोडली, तर मुख्यतः आपल्या बिघडत चाललेल्या आत्मघातकी जीवनशैलीशी आहे.




Reviews
There are no reviews yet.