Description
साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी त्याची ‘मधुमेह होमिओपॅथी चिकित्सा’ ही पुस्तिका प्रकाशित झाली होती. त्यामध्ये त्याने मधुमेह नियंत्रणाविषयीच भाष्य केले होते. नंतरच्या त्याच्या प्रगल्भ अनुभवानंतर पुस्तिकेचे आता म्हणजेच बारा वर्षांनंतर ‘मधुमेहातून मुक्तीचा आनंद‘ या पुस्तकामध्ये रूपांतर केले आहे. या पुस्तकात इतर आजारांसह विशेष करून मधुमेहाविषयी होमिओपॅथी उपचारपद्धतीचा सविस्तर ऊहापोह केला आहे. रुग्णाने योग्य ती खबरदारी घेतल्यास त्याची मधुमेहातून मुक्ती होऊ शकते, हा त्याचा सिद्धांत आपल्या प्रदीर्घ अभ्यासाने अनुभवाने उदाहरणांसह सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. २०१० मधील ‘मधुमेह होमिओपॅथी चिकित्सा’ या पुस्तिकेच्या वाचनानंतर त्यावेळीच मला जाणवले होते की, डॉ. प्रकाश एवढ्यावरच थांबणार नाही. त्यावर तो संशोधन करून मधुमेह बरा होऊ शकतो का?, होऊ शकल्यास ते कसे शक्य करता येईल, याबाबत तो प्रयत्नशील राहणार.





Reviews
There are no reviews yet.