होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युएल हानेमान यांचे चरित्र

200.00

Category: Tag: Product ID: 1569

Description

मी शिक्षण आणि व्यवसायाने एक होमिओपॅथिक डॉक्टर आणि योगायोगाने धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, पुणे या कॉलेजच्या संस्थेचा विश्वस्त. मला वैयक्तिक, सामाजिक आयुष्यात जे मिळाले ते होमिओपॅथिक या शास्त्रामुळे. या शास्त्राचा शोध आणि विकास जर्मन शास्त्रज्ञ डॉ. सॅम्युएल हानेमान यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या मराठीत लिहिल्या जात असलेल्या चरित्रात मी प्रस्तावना लिहण्यास नाही म्हणावे हे शक्यच नव्हते. फक्त संकोच होता. कारण, या पुस्तकाचे लेखक माझे सन्मित्र डॉ. प्रकाश शिंदे हे वय, ज्ञान, अधिकार या सर्व बाजूंनी माझ्यापेक्षा खूपच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. त्यामुळे त्यांनी मला या पुस्तकाला प्रस्तावना लिही हे म्हणावे, हा मी माझा बहुमान समजतो.

असे म्हणतात, जग केवढे ? तुमच्या डोक्याएवढे ! म्हणजेच ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ लेखकाची प्रेरणा ही त्याच्या आतच वसत असते. गेले कित्येक वर्षे डॉ. प्रकाश शिंदे हे होमिओपॅथिक व्यवसाय करतात. होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युएल हानेमान यांचे चरित्र लिहावे असे त्यांना वाटले तर फार नवल नाही. पण एक आदर्श डॉक्टर, एक चिकाटीचा प्रवासी, एक सश्रद्ध माणूस, समाजाला योग्य काय हे समाजाला लोकप्रियतेचा विचार न करता सांगणारा डॉक्टर, रुग्णाविषयी मनस्वी तळमळ, आस्था असणारा डॉक्टर या सर्वांगांचा डॉ. हानेमान यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय डॉ. प्रकाश शिंदे आपल्याला करून देतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युएल हानेमान यांचे चरित्र”

Your email address will not be published. Required fields are marked *