Description
‘आरोग्य मंथन’ हे माझं पुस्तक वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. माझ्या या पुस्तकातील सर्वच लेख हे ‘दै. लोकमत’ मधील हॅलो कोल्हापूर या पुरवणीत २०१५ मध्ये प्रकाशित झालेले आहेत. वाचकांनी माझ्या लेखमालेला भरभरून प्रतिसाद दिला. मी लिहिलं आणि वाचकांनी प्रत्येक लिखाणाची पसंती माझ्यापर्यंत पोहचविली. याचं संपूर्ण श्रेय दै. लोकमत पेपरला जातं. माझ्या लेखमालेत भारतीय वैद्यकशास्त्रातील सर्वच पॅथींना आदराचे स्थान दिल्याचे दिसून येते आणि म्हणूनच यात प्राचीन भारतीय वैद्यक, आयुर्वेद, युनानी, अँक्युपंक्चर, होमीओपॅथी, लसीकरण, प्रतिजैवके, पर्यावरण, जल, प्राणायाम, संगीत मंत्र आदी सर्वच बाजूंचा मानवी आरोग्याच्या दृष्टीने उल्लेख करण्यात आला. यात परंपरागत आणि आधुनिक शास्त्र यांचाही उहापोह करण्यात आला आहे. आजच्या तरुण पिढीने याचा अभ्यास, मनन, चिंतन आणि मंथन करणं आज काळाची गरज आहे. भारतीय संस्कृती आणि वैद्यकशास्त्राचा अभ्यास करता निश्चितच आपली परंपरा ही ५००० वर्षांपूर्वीची उत्तुंग आणि व्यापक असल्याची दिसून येते. या ५००० वर्षांपूर्वीच्या आयुर्वेदिक परंपरेला शरिरातील नैसर्गिक प्रतिकार शक्ती.




Reviews
There are no reviews yet.