Description
मधुमेहाचे भारतातील वाढते प्रमाण हे वैद्यकीय शास्त्राचे दृष्टीने एक मोठे आव्हान ठरले आहे. हे प्रमाण असेच वाढत राहीलेस प्रत्येक पाचवा भारतीय हा मधुमेही असेल आणि जगातील प्रत्येक पाचवा मधूमेही हा भारतीय असेल. मधुमेह हा इंद्रियातील किंवा चयापचयातील बिघाडीमुळे निर्माण होणारा रोग आहे. आपण जे अन्न सेवन करतो त्याचे शरीराअंतर्गत प्रक्रियेमुळे (Metabolism) विविध शरीरात उपयुक्त घटकात रुपांतर केले जाते या अन्न रुपांतर होण्याच्या प्रक्रियेमध्ये दीर्घ मुदतीचा बिघाड झाल्यास (Chronic) उदा. मनुष्याने सेवन केलेल्या अन्नातील ग्लुकोजचे रुपांतर (Utilisation) पूर्णपणे अगर अर्धवट झाल्यास मधुमेह संभवतो. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तातील शर्करा, प्रथिने आणि चरबी यांचे रूपांतर क्षमतेत बदल घडतो. (Alteration in Metabolism) असे घडण्याचे प्रमुख कारण म्हणजे पोटाजवळ असलेल्या उंडक ग्रंथीतील (Liberation) आयलेटस् ऑफ लंगरहन्स (Pancreas) बीटासेल्स (Beta Cells) या पेशीपासून तयार होणाऱ्या इन्सुलीन (Insulin) या अंतस्रावाची मुळातून निर्मितीच न होणे किंवा इन्सुलीन रक्तात न मिसळणे (Liberatvon) किंवा रक्तात मिसळलेल्या इन्सुलीनची कार्यक्षमताच थांबणे (Inaction) या शरीरांतर्गत बिघडलेल्या अवस्थेचे फलस्वरूप म्हणजे मधुमेह.






Reviews
There are no reviews yet.